Update By Headmaster
शासनाच्या कर्मचाऱ्यांची माहिती असलेल्या Udise आणि शालार्थ या दोन श्रोतामधून आपल्या शाळेतील कर्मचाऱ्याची माहिती सरल प्रणाली मध्ये घेणे म्हणजे Mapping करणे होय.ही Mapping ची प्रक्रिया झाल्यानंतर या सर्व कर्मचाऱ्याची माहितीमध्ये काही बदल असल्यास ही माहिती अद्यावत म्हणजेच update करणे गरजेची आहे.म्हणून Mapping नंतर ही पायरी खूप महत्वाची ठरते.ज्या कर्मचाऱ्यांचे Mapping झालेले आहे ते सर्व कर्मचारी Update By Headmaster या सुविधेमध्ये त्यांची माहिती Update करण्यासाठी उपलब्ध होतात.अशा सर्व कर्मचाऱ्यांना एक एक करून Update करणे गरजेचे आहे.अशा कर्मचाऱ्यांस Update करताना कशा पद्धतीने Update करावे हे आता सविस्तरपणे समजावून घेऊ.Update By Headmaster या tab ला क्लिक केल्यावर आपणास खालील स्क्रीन दिसून येईल.सर्वप्रथम आपण अशा कर्मचाऱ्यास select करावे.कर्मचाऱ्यास select केल्यावर आपणास खालील प्रमाणे एक स्क्रीन दिसून येईल.
वरील स्क्रीन मध्ये जेंव्हा आपण कर्मचाऱ्यास select करू तेंव्हा आपणास त्या कर्मचाऱ्यांसंदर्भात तीन प्रकारची उभ्या कॉलम मध्ये माहिती दिसून येईल.अ) shalarth मधील माहितीआ) udise मधील माहितीइ) Edited By Headmaster मधील माहिती.वरील तीन प्रकारची माहिती पाहिल्यावर आपल्या असे लक्षात येईल की आधीच्या दोन प्रकाराची माहिती ही आपणास फक्त माहितीसाठी दाखवण्यात आलेली आहे.त्यात कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही.परंतु तिसरा हो प्रकार आहे तो म्हणजे Edited By Headmaster होय.या प्रकारात आपण आधीच्या दोन्ही प्रकारातील म्हणजेच shalarth व udise मधील माहिती पाहून त्यातील जी माहिते योग्य असेल ती भरावयाची आहे.कधीकधी shalarth व udise किंवा दोन्ही मधील माहिती ही चूक असू शकेल.म्हणून आपण तिसऱ्या प्रकारातील माहिती भरत असतांना shalarth व udise मधील जी योग्य माहिती आहे तीच माहिती update करावयाची आहे.माहिती update करताना आपण त्या माहितीमध्ये काय अपेक्षित आहे हे प्रत्येक मुद्यानिहाय पाहू.१)Teacher Code : या मध्ये आपणास काहीही भारावयाचे नाही आहे.प्रत्येककर्मचाऱ्यांस system कडून एक सरल स्टाफ code देण्यात येतो.हा स्टाफ कोड आपणास एकदाच कायमस्वरुपी मिळणार आहे.हा कोडच आपणास भविष्यात शासकीय कामात आपल्या नावाची ओळख म्हणून गृहीत धरण्यात येणार आहे.त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांनी या कोडची नोंद करून ठेवावी.२) First Name : या ठिकाणी कर्मचाऱ्यांने आपले स्वतःचे प्रथम नाव लिहावे.३) Middle Name : या ठिकाणी कर्मचाऱ्यांने आपल्या वडीलांचे नाव (महिला कर्मचाऱ्यांने आपल्या वडिलांचे किंवा पतीचे नाव) लिहावे.४) Last Name : या ठिकाणी कर्मचाऱ्यांने आपले आडनाव लिहावे.सुचना : या स्क्रीन वर सुरुवातीला आडनावाच्या रकान्यात कर्मचाऱ्यांचे पूर्ण नाव system कडून आलेले असते.ते नाव काढून वरील तीन रकान्यात दिलेल्या सूचनेप्रमाणे आपले नाव लिहावे.अभ्यासासाठी खालीळ स्क्रीन पहा.
No comments:
Post a Comment