Saturday, 18 March 2017

आमच्याविषयी




मी संजय जाधव ( एम.ए.एम.स्सी.बी.एस्सी.बी.एड.डी.एस.एम. ) जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्था जळगाव या संस्थेने चालविलेल्या शाखातंर्गत किसान माध्यमिक विद्यालयात ७ वर्षापासून सेवेत तसेच २० वर्षापासून संस्थेच्या सेवेत आहे. २० वर्षाच्या सेवेत विज्ञान आणि गणित या विषयाच्या इयत्ता १० वी चा निकाल हा अतिशय चांगल्या प्रकारचा म्हणजे जवळजवळ १०० % लागलेला आहे. सन २०१७ मार्च अखेर तंत्रस्नेही प्रशिक्षण घेतले. याकरीता मला व माझ्या सहकारीना जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी श्री देविदास महाजन साहेब, तालुका गटशिक्षणारी डॉ.भावना भोसले मँडम,विस्तार अधिकारी श्रीमती.कविता सुर्वे मँडम, श्री.सी.एम.चौधरीसर, केंद्र प्रमुख श्री.मिस्त्री सर तसेच गिरिश देवकर आणि भदाणे सर (पंचायत समिती पारोळा)यांचे सहकार्य लाभले. तंत्रस्नेही प्रशिक्षणातून विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञानाची ई शैक्षणिक साहित्य, ई शिक्षण, ई पुस्तके मिळवण्याच्या छंद विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करता येईल. या सर्व यशाच्या मागे माझी संस्था आणि माझ्या संस्थेचे पदाधिकारी संस्थेचे अध्यक्ष श्री.आण्णासो नरेंद्र भास्कर पाटील आणि त्यांचे बंधू श्री. विजय भास्कर पाटील. आणि संस्थेचे संचालक मंडळ तसेच किसान माध्यमिक विद्यालय शेवगे बु. ता.पारोळा, जि. जळगाव. स्थानिक स्कूल कमिटीचे चेअरमन श्री. आण्णासो हरिचंद्र भानुदास पाटील आणि त्यांचे संचालक मंडळ तसेच पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष , उपाध्यक्ष , सचिव आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. राजेंद्र मधुकर पाटील, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेतील जेष्ठ शिक्षक इत्यादी मंडळी आमच्या मागे भक्कमपणे उभे आहेत आणि विशेष सहकार्य करतात. 

No comments:

Post a Comment

Popular Posts