शाळा विकास आरखडा


शाळा विकास आराखडा School Development Plan

     
                     शाळा विकास आराखडा School Development Plan म्हणजे काय ? शाळा विकास आराखडा व शालेय व्यवस्थापन सामिती यांचा संबंध काय आहे.शालेय विकास आराखडा कसा तयार करावा ? इत्यादी सर्व प्रश्नाची उकल करण्यासाठी आपण ही शब्द बांधणी करत आहोत. 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्कअधिनियम २००९ RTE 2009, मधील कलम २२ ( १ ) नुसार शाळा व्यस्थापन समितीने शाळा विकास आराखडा तयार करावा. संबंधित केंद्रप्रमुख / समन्वयक यांनीआराखड्याचे मूल्यमापन करावे. हा आराखडा स्थानिक प्राधिकरणाला ( ग्रामपंचायत, नगरपरिषद, महानगरपालिका किंवा कटक मंडळ )तत्काळ सादर करावयाचा आहे. 

शाळा विकास आराखडा हे आधार क्षेत्र आहे :
शाळा विकास आराखडा हा पुढील चार क्षेत्रावर आधारित आहे.
१. शाळा सुविधा
२. समता 
३. गुणवत्ता
४. लोकसहभाग


शाळा विकास आराखड्याचा उद्देश :

१. कृती आराखडा या माध्यमातून शालेय व्यवस्थापन समिती चे शिक्षक, मुख्याध्यापक, पालक व ग्रामस्थ यांच्या सहभागातून शाळेच्या गरजा, बलस्थाने व उणीवा यांचा शोध घेऊन कृती आराखडा तयार करणे.
२. शाळा विकास आराखडा हा समूह आराखडा, गट / मनपा आराखडा, जिल्हा/ राज्य वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक निर्मितीचा पाया आहे. म्हणून शाळा विकास आराखड्यातील आकडेवारी अचूक असावी.
३. उपरोक्त नमूद आधारक्षेत्रांमध्ये समन्वय प्रस्थापित करून शालेय व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून शालेय विकास लोकसहभागाच्या माध्यमातून करवणे.
४. शाळेसमोर येणारी नवनवीन आवाहने स्थानिकांच्या मदतीने सोडविणे.

त्यामुळे प्रस्ताविकाच्या शेवटी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य सचिव यांची स्वाक्षरी असावी असे नमूद आहे.



S.R. 

Descfription

Link

Remark

1)

शाळा विकास आराखडा २०२३ -२४

   


2)

शाळा विकास आराखडा २०२४ -२५




3)

शाळा विकास आराखडा २०२५ -२६





No comments:

Post a Comment

Popular Posts