Thursday, 14 May 2020

सेवा पुस्तक संदर्भात

सर्व्हिस बुक संदर्भात

सेवा पुस्तिका (सर्व्हिस बुक) संदर्भात खालील महत्वाची माहिती

🎯सर्व्हिस बुक मध्ये ऑनलाईन ची घाई ,अथवा गडबड करू नये  आपल्या सर्विसबूक मध्ये सर्व माहिती बरोबर आहे का याची खात्री करूनच किंवा आपल्या पंचायत समिती मधील तज्ज्ञांच्या माहिती नुसार (ट्रेंन तज्ञ) माहिती तपासून घ्यावी
🎯 ऑनलाईन सर्व्हिस बुक  अपडेट करणे शासकिय कर्मचा-याची मूळ सेवा पुस्तिका म्हणजे ....मी तर म्हणेनन कर्मचाऱ्याचा त्यांचा आत्माच....!*

🎯त्यामुळे अगदी सेवा निव्रुत्त होईपर्यंत व त्यानंतर ही हा अतिशय महत्वाचा दस्तावेज शेवट पर्यंत जपून ठेवणे आवश्यक आहे

🎯 स्वता: कर्मचा-याने याबाबत दक्ष राहुन सेवा पुस्तिकेकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

🎯याबाबतचा त्रास मग जेव्हा सेवा निवृत्ती जवळ येते त्यावेळेस जाणवतो.

🎯त्यावेळेस मग महत्वाच्या नोंदी करायच्या असतील तर ते रेकार्ड सापडत नाही.

🎯 *सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर आढळणा-या काही त्रुटी.....!*
१.सर्व सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर आढळणारी एक त्रुटी म्हणजे *गटविमा नोंदी*.
गट विम्याच्या नोंदी मधे खालील प्रकारच्या त्रुटी आढळुन येतात...

१. गटविमा नोंद करतांना ज्या वेतन बिलात गटविमा वर्गणी कपात झाली त्या व्हाँवचर नंबर ची नोंद नसणे .

२.गटविमा नोंदीत खाडाखोड असणे.

३. शासन नियमाप्रमाणे वेळोवेळी गटविमा वर्गणीत झालेल्या बदलानुसार सुधारित नोंदी नसणे.

४. एखाद्या कर्मचा-याची पदोन्नती झाली असेल तर वेतनश्रेणीच्या अनुषंगाने गटविमा वर्गणी कपात नसणे.

५.सुधारित वर्गणी कपात उशिरा सुरु करण्यात आली असेल तर त्या वर्गणीच्या फरकाची नोंद नसणे.

६.गटविमा नोंदिवर गशिअ /  मुअ यांची स्वाक्षरी नसणे.

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.

यामुळे सेवाननिवृत्ती नंतर गटविमा रक्कम परतावा परत घेतांना   वर्गणी कपात होवुन ही योग्य ती नोंद नसेल तर वर्गणीची रक्कम व्याजासह भरावी लागते.
त्या शिवाय आपल्याला आपली जमा असलेली गटविमा परताव्याची रक्कम जिल्हा परिषद देत नाही.

*
त्यामुळे कर्मचा-याने आपल्या गटविम्याच्या   नोंदी अद्यावयत आहे की नाही याची खात्री केलेली बरी.*

🎯*सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर आढळणा-या काही त्रुटी.....!*

अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर आढळणारी  त्रुटी म्हणजे * नेमणूक, कार्यमुक्ती व उपस्थिती बाबत नोंदी*.

*
कर्मचा-याची नेमणूक अथवा बदली झाल्यानंतर  त्याबाबतची कार्यमुक्ती व उपस्थिती  ची नोंद आदेश क्रमांकासह व दिनांकासह  सेवापुस्तिकेत असणे आवश्यक आहे.*

सामान्यपणे आढळणा-या त्रुटी.

१. नेमणूक, कार्यमुक्ती व उपस्थिती  ची नोंद  सेवापुस्तिकेत नसणे.

२. सविस्तर आदेशासह व दिनांकासह नोंद न घेता संक्षिप्तपणे नोंद असणे.

३.  नोंद घेतलेली असते पण त्यावर गशिअ / संस्थापक / मुख्याध्यापक  ची स्वाक्षरी नसणे.

४.कधी कधी कार्यमुक्ती ची नोंद असते पण उपस्थितिची नोंद नसणे.

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.

यामुळे  बदली झालेल्या सर्व नोंदी जर नसेल तर सेवानिवृत्ती वेतन प्रस्ताव मंजुर करतांना त्रुटी दर्शवुन प्रस्ताव परत केला जातो.


*
त्यामुळे कर्मचा-याने आपल्या बदलीच्या सर्व  नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.*

       

*
सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर आढळणा-या काही त्रुटी.....!*

अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर अाढळणारी  त्रुटी म्हणजे

*
वारसाबाबत   नामनिर्देशन*.

*
आजच्या बेभरवशाच्या  काळात माणसाचे कधी काय होईल याचा नेम नाही त्या मुळे दुर्दैवाने जर कर्मचा-याच्या बाबतीत काही बरी वाईट घटना घडली तर  सेवापुस्तिकेत  नामनिर्देशनाची नोंद योग्य प्रकारे नसेल तर पुढिल मिळणा-या आर्थिक लाभासाठी व इतर कामासाठी कुटुंबियाना कोर्ट कचेरीत खेट्या माराव्या लागतात त्यासाठी सेवापुस्तिकेत नामनिर्देशनाची योग्य नोंद  असणे आवश्यक आहे.*

*
आपण जर आजच्या तारखेत नामनिर्देशन केले असेल तर ते आवश्यकता वाटल्यास सहा महिन्यानंतर  ते बदलू शकतो*

*
सामान्यपणे आढळणा-या त्रुटी.*

१. नामनिर्देशाना ची नोंद  सेवापुस्तिकेत नसणे.

२.  चार प्रकारच्या नामनिर्देशन नोंदी पुर्ण नोंद नसणे.

३.  नोंद घेतलेली असते पन
     
त्यावर गशिअ  / मुख्याध्यापकांची स्वाक्षरी नसणे.

४.सुरुवातिला केलेल्या नामनिर्देशनात कालांतराने वारसाच्या नावात बदल
 
अथवा वारसात बदल झाला असेल तर त्याबाबत
  
नोंद अद्यावयत नसणे.

अशा सर्वसामान्यपणे त्रुटी आढळून येतात.

यामुळे  एखादा कर्मचारी दुर्दैवाने सेवेत कार्यरत असतांना मयत झाला तर कुटुंबियासमोर अनेक अडचणी येतात.

*
त्यामुळे कर्मचा-याने आपल्या नामनिर्देशना बाबतच्या सर्व  नोंदी अद्यावयत आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.*
〰〰〰〰〰〰〰〰〰

*
सेवा पुस्तिकेत मोठ्या प्रमाणावर आढळणा-या काही त्रुटी.....!* 

अजुन एक सामान्यपणे मोठ्या प्रमाणावर आढळणारी  त्रुटी म्हणजे

*
मुळवेतन व ग्रेड पे बाबत नोंदी*.

*
आजही एखाद्या  कर्मचा-याला त्याचे मूळवेतन विचारले तर ते सांगतांना गोंधळ दिसुन येतो एकतर तो वेतनबँड सांगतो किंवा मुळवेतनासह पुन्हा ग्रेड पे सांगतो*

याबाबत दोन संकल्पना आजही स्पष्ट होणे गरजेचे आहे.

*
पे बँड म्हणजे आपली वेतनश्रेणी व ग्रेड पे*

*
बँड पे म्हणजे वेतनश्रेणीतील मूळवेतन + ग्रेड पे.*

*
सहाव्या वेतन आयोगा मध्ये ग्रेड पे ही नविन संकल्पना असल्यामुळे याबाबत वेतनवाढिच्या व मुळवेतनाच्या नोंदी करताना ब-याचदा गोंधळ दिसुन येतो. उदा. एखाद्या कर्मचा-याचे वेतनबँड ५२००-२०२०० मधे मूळवेतन ८९००+२८०० एकूण  ११७०० असेल तर ब-याचदा नोंद करताना ११७००+२८०० अशी नोंद केल्या जाते. त्यामुळे पुढिल वर्षाची वेतनवाढ देताना चूक होवु शकते. त्यामुळे मुळवेतन व ग्रेडपे स्वतंत्रपणे दर्शविणे आवश्यक आहे*

*
अजुन एक महत्वाची बाब म्हणजे कर्मचा-याच्या मूळवेतनात कोणत्याही कारणामुळे बदल झाला असेल तर त्याची सविस्तर नोंद वेतननिश्चिति करुन सेवापुस्तकेत असणे आवश्यक आहे*

*
जुलै-२०१४ मधे किंवा त्यानंतर पदवीधर वेतनश्रेणी मिळालेल्या शिक्षकांसाठी अत्यंत महत्वाचे....!*

*
जुलै-२०१४ मधे किंवा त्यानंतर मोठ्या प्रमाणावर प्रा.शिक्षकांना पदवीधर शिक्षकाची वेतनश्रेणी देण्यात आली.*

*
त्या नंतर दि. २१/११/२०१६  च्या आदेशाने ती रद्द करण्यात आली.*

*
मा.हायकोर्टाने दिलेल्या दि.२०/२/१८ च्या आदेशानुसार  दि.२१/११/२०१६ चे वेतनश्रेणी रद्द करणेबाबत चा आदेश  रद्द केल्यामुळे . मा. मुकाअ जि प औरंगाबाद यांनी  दि.१५/५/२०१८ ला वेतनश्रेणी  पुन्हा लागु करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले*.

*
यामूळे संबंधित पदवीधर प्रा.शिक्षकांच्या सेवापुस्तिकेत तीन प्रकारच्या वेतननिश्चिति नोंद असणे आवश्यक आहे.*

१. जुलै-२०१४ च्या आदेशाने पहिली वेतन निश्चिति.

२. दि.२१/११/२०१६ च्या आदेशाने  वेतनश्रेणी रद्द बाबत वेतननिश्चिती.

३. मा.मुकाअ यांच्या आदेशानुसार पुन्हा वेतनश्रेणी लागु करण्याबाबत वेतननिश्चिती.

*
पदविधर वेतनश्रेणी रद्द झाल्यानंतर काही शिक्षकांची वेतनश्रेणी मासिक बिलात रद्द झाली परंतू सेवापुस्तिकेत त्याबाबत वेतननिश्चिती करुन रद्द केल्याचे आढळुन येत नाही*

*
ज्या शिक्षकांनी १५ / ५ / १८ पर्यंत  पदवीधर वेतनश्रेणीची वेतननिश्चिति केली नसेल तर त्यांनी फक्त जुलै १४ च्या आदेशानुसार एकदाच वेतननिश्चिती करावी.*

*
त्यामुळे कर्मचा-याने आपल्या मूळवेतना बाबतच्या सर्व  नोंदी अचुक आहे की नाही याचीही खात्री केलेली बरी.*

  कर्मचा-यांच्या बाबतीत दोन महत्वाच्या गोष्टी  होणार आहे ....!*

 *
१. सातवा वेतन आयोग.*

सातवा वेतन आयोग लागु झाला असल्यामुळे जर मुळ वेतना बाबतच्या काही त्रुटी असतील तर सातव्या आयोगाप्रमाणे होणारी वेतननिश्चती चुकीची होईल.

त्यामुळे एकतर वेतन जास्त मिळेल किंवा कमी.

*
त्यामुळे वेतन आयोगात होणा-या सगळ्या बाबी अचुक होण्यासाठी वेतनाबाबत च्या त्रुटी काळजीपुर्वक आपल्या कार्यालयाकडुन पुर्ण करुण घेणे आवश्यक आहे .*

*
त्यासाठी महत्वाचे म्हणजे*


*
जि.प.च्या वित्त विभागाकडुन किंवा वरिष्ठ लेखाधिकारी यांचेकडून सेवापुस्तिकेची आज पर्यंत मिळालेल्या  सर्व वेतन आयोगाची व इतर वेतन निश्चितीची वेतन पडताळणी होणे गरजेचे आहे. वेतनात काही तफावत असेल तर वेतनपडताळणीत ते समोर येईल पर्यायाने त्याची दुरुस्ती करणे सॊपे होईल.*

*
वरिल सर्व बाबींची पडताळणी झालेली असेल आणि पडताळणीत जि.प. लेखाधिका-यांनी काही आक्षेप नोंदवले असेल तर त्या सर्व आक्षेपांची पुर्तता करणे आवश्यकच राहिल*

*
२.सर्व्हिस बुक online*

सेवापुस्तिकेत जर काही त्रुटी असतील तर त्या तशाच online upload होतील.

परीणामी  कर्मचा-याला भविष्यात अडचणी निर्माण होवू शकतात.

*
यासाठी सेवापुस्तिकेत काही त्रुटी असतील त्या वेळिच दुरुस्त होणे गरजेचे आहे.*


*
सेवापुस्तिका कार्यालयात जमा करण्यापुर्वी..*

🎯१. मूळ सेवा पुस्तिकेत
  
कार्यमुक्ति बाबत सविस्तर  नोंद व
    
मा.गशिअ / मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी असल्याबाबत खात्री करणे.

🎯२. यापूर्वि  केलेल्या नोंदींवर
   
  मा.गशिअ / मुख्याध्यापक यांची स्वाक्षरी
       
असल्या बाबत खात्री  
       
करणे.
    
उदा. गटविमा नोंद
           
नामनिर्देशन नोंद
           
रजा मंजुरि नोंद
            
प्रशिक्षण नोंद
            
जादा अदाई वसुलि.
          
स्थायित्वा बाबत नोंद
     
मराठि / हिंदी परीक्षा सुट.

🎯३. कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत
    
रजेचा हिशोब पुर्ण   
  
असल्याबाबत खात्री करा .

🎯४.कार्यमुक्तिच्या तारखे पर्यंत
    
सेवा पडताळणी बाबत
    
नोंद असल्याची खात्री
     
करा .

🎯५. ज्या शाळेवर उपस्थित झाले त्या बाबत आदेश क्रमांका सहित सविस्तर उपस्थिति बाबत नोंद मूळ सेवा पुस्तिकेत करवून घ्या.

🎯६. L.P.C. वर स्वता:चा
   
शालार्थ ID असल्याबाबत
   
खात्री करा.

🎯 *७.अत्यंत महत्वाचे*
   *
माहे फेब्रु..२०१८ च्या
  
वेतनातुन वै.अपघात विमा
  
वर्गणी कपात झाली असेल तर सेवा पुस्तिकेत प्रमाणक क्रमांक टाकुन त्याबाबत नोंद घेणे.*

🎯८.मागील एक दोन वर्षाच्या काळात काही जादा अदाई/ रिकव्हरी अदा केली असेल तर त्याबाबत नोंद केल्याची खात्री करा. रिकव्हरीचे विवरणपत्र जपुन ठेवा.
उदा.   Mscit  रिकव्हरी शासन निर्णय  ०५.०५.२०१०  नुसार रिकव्हरी, गटविमा फरक.इ.

🎯 *चट्टोपाध्याय आयोगानुसार शिक्षकांना दिल्या जाणा-या वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड वेतनश्रेणी या दोन्ही श्रेण्याबाबत ब-याचदा गोंधळ उडतो वरिष्ठ कोणती न निवड कोणती आणि कोण त्यासाठी पात्र ??*


🎯 *साधारण पणे एकाच वेतनश्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले कि त्यापुढची वरिष्ठ श्रेणी मिळते. आणि वरिष्ठ वेतन श्रेणीत १२ वर्ष वेतन घेतले की त्या पुढची मग निवडश्रेणी मिळते .पण यासाठी शासनाने विहित केलेल्या अटि पुर्ण केल्या नंतरच ..*

🎯 *मागच्या वर्षी   शासनाने काढलेल्या २३ अाक्टो २०१७  मधील चट्टोपाध्यायच्या  सुधारीत जी.आर. मधील नियम व अटी ( विकल्यप घेणे ) बघितल्यावर यापुढे कोणाला वरिष्ठ किंवा  निवडश्रेणी मिळेल असे वाटत नाही.*

*
विशेष करुन संभ्रम पडतो  तो  निवडश्रेणी बाबत.*

*
उदा. जर एखाद्या प्रा.शिक्षकाने १२ वर्षानंतरची वरिष्ठ श्रेणी ग्रेडपे ४२०० घेतली तर याच ग्रेडपे मध्ये १२ वर्ष वेतन घेतल्यानंतर पुढची निवडश्रेणी म्हणजे ग्रेडपे ४३०० मिळेल अर्थातच विहित नियम व अटी पुर्ण केल्या तरच.*

*
परंतू एखाद्या प्रा.शिक्षकाने वरिष्ठ श्रेणी  ग्रेडपे ४२०० घेतल्यानंतर त्याने प्रा.पदवीधर वेतनश्रेणी ,मुअ किंवा माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० स्विकारली तर त्या शिक्षकाला या पुढची कोणतीच चट्टोपाध्यय श्रेणी मिळत नाही.*

*
याचे कारण असे की, ग्रेडपे ४२०० ही प्रा.शिक्षकाची चट्टोपाध्ययची वरिष्ठ श्रेणी आहे .आणि यापुढची निवडश्रेणी ग्रेडपे ४३०० आहे.*

*
वारंवार ब-याच जनांकडुन असा प्रश्न विचारल्या जातो कीमी चट्टोपाध्याय वरिष्ठ श्रेणी ४२०० घेतल्यानंतर पुढे प्रा.पदवीधर किंवा मुअ किंवा  माध्यमिक शिक्षकाची वेतनश्रेणी ग्रेडपे ४३०० घेवून  मला १२ वर्षे याच वेतनश्रेणीत  झाली .मग आता मला ४४०० ग्रेड पे मिळेल का ????*

*
तर वरिल प्रश्नाचे उत्तर  राहिल नाही. अशा शिक्षकाला ४४०० ग्रेड पे मिळणार नाही*

*
याचे महत्वाचे कारण म्हणजे एका कर्मचा-याला दोनदा वरिष्ठश्रेणी देता येत नाही.*

*
प्रा.शिक्षकाची वरिष्ठश्रेणी ग्रेड पे ४२०० अाहे.*

*
आणि  प्रा.पदवीधर ,मुअ व माध्यमिक  शिक्षकाची वरिष्ठ श्रेणी ग्रेड पे ४४००*
*
असल्यामुळे वरिल प्रश्न असलेल्या शिक्षकांना ग्रेड पे ४३०० मध्ये १२ वर्ष जरी झाले तरी प्रचलित    नियमानुसार तरी कोणतिही पुढची वेतनश्रेणी मिळणार नाही.*

माहितिस्तव :- सहावा आणि सातवा वेतन आयोग वेतनश्रेणी व वेतनस्तर
〰〰〰〰〰〰〰〰〰
 *
प्राथमिक शिक्षक*

*
मुळवेतन स्तर *
*
ग्रेड पे -२८०० * S – 10 ( 29200 – 92300 )  

*
वरिष्ठ श्रेणी.ग्रेडपे  ४२००* S – 13 ( 35400 – 112400 )  

*
निवड श्रेणी ग्रेडपे ४३००* S – 14 ( 38600 – 122800 )  
〰〰〰〰〰〰〰〰〰

*
प्रा.प.शि./ प्रा.मु.अ / माध्य.शिक्षक*

*
मुळवेतन श्रेणी*
*
ग्रेड पे -४३००* S – 14 ( 38600 – 122800 )  

*
वरिष्ठ श्रेणी.ग्रेडपे  ४४००* S – 15 ( 41800 – 132300 )  

*
निवड श्रेणी ग्रेडपे ४८००* S – 17 ( 47600 – 151100 )  

〰〰〰〰〰〰〰〰〰

*
माध्य.उपमुख्याध्यापक*

*
मुळवेतन श्रेणी*
*
ग्रेड पे - ४६००* S – 16 ( 44900 – 142400 )  
 


*
वरिष्ठ श्रेणी.ग्रेडपे  ५४००* S – 20 ( 56100 – 177500 )

 

〰〰〰〰〰〰〰〰〰

*
माध्य.मुख्याध्यापक*

*
मुळवेतन श्रेणी*
*
ग्रेड पे - ४८००* S – 17 ( 47600 – 151100 )  
*उच्च माध्यमिक असल्यास

 ग्रेड पे - ४९००* S – 18 ( 49100 – 155800 )


*
वरिष्ठ श्रेणी.ग्रेडपे  ५७००* S – 22 ( 60000 – 190800 )

*उच्च माध्यमिक असल्यास

 ग्रेड पे - ५८००* S – 22 ( 60000 – 190800 )

 

   

*
ही माहिती स्वतः संकलित केली असून तरी आणखी तज्ञाकडून खातरजमा करून यापेक्षाही काही अपडेट राहिले असल्यास खात्री करून घ्या*

 

सेवा पुस्तिका नोंदी

सेवापुस्तक अद्ययावत करतांना खालील बाबींच्या नोंदी केलेल्या आहेत किंवा नाही हे तपासून पहावे व नसतील तर तशा नोंदी घेऊन सेवापुस्तक अद्ययावत करावे.

--------------------------
👉१. पहिल्या पानावरील जन्मतारखेची नोंद पडताळणी
👉२. पहिल्या पानावरील नोंद दर पाच वर्षांनी तपासणी करुन प्रमाणित करणे.
👉३. वैद्यकिय दाखल्याची  नोंद.
👉४. जात पडताळणी बाबदची नोंद.
👉५. भविष्य निर्वाह निधी खाते क्रमांक नोंद.
👉६. निवृत्तीवेतन नामनिर्देशनाची नोंद.
👉७. मृत्यू अन सेवानिवृत्ती उपदान नामनिर्देशनाची नोंद.
👉८. गटविमा योजणेच्या सदस्यत्वाची नोंद.
👉९. गटविमा योजणेच्या वर्गणीची नोंद. ( सुरुवातीची व वेळोवेळी बदलानुसार )
👉१०. गटविमा नामनिर्देशनाची नोंद.
👉११. विहीत संगणक आर्हता परिक्षा उत्तीर्ण नोंद.
👉१२. सेवांतर्गत प्रशिक्षणाची नोंद.
👉१३. वार्षिक वेतनवाढ नोंद.
👉१४. वार्षिक वेतनवाढ मंजुरीनंतर रकाना क्र. ८ मध्ये कर्मचाऱ्याची स्वाक्षरी.
👉१५. नाव बदनाची नोंद.
👉१६. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती आदेशाची नोंद.
👉१७. बदली / पदोन्नती / अन्य नियुक्ती नुसार कार्यमुक्त / हजर / पदग्रहण अवधी नोंद.
👉१८. सेवेत कायम केल्याची नोंद.
👉१९. स्वग्राम घोषपत्राची नोंद.
👉२०. वेतन आयोगानुसार वेतन निश्चिती नोंद व पडताळणीची नोंद.
👉२१. पदोन्नती / आश्वासित प्रगती योजना / एकस्तर यामुळे झालेल्या वेतन निश्चितीची नोंद.
👉२२. पुरस्कार प तद्नुषंगिक अनुज्ञेय लाभाच्या नोंदी.
👉२३. अर्जीत / परावर्तीत रजा दर सहामाही जमा केल्याची नोंद.
👉२४. घेतलेल्या रजेच्या आदेशाची नोंद व रजा लेख्यात खर्ची घातल्याची नोंद.
👉२५. रजा प्रवास सवलत नोंद.
👉२६. दुय्यम सेवापुस्तक दिल्याबाबतची नोंद.
👉२७. मानीव दिनांक / वेतन समानीकरण संबंधीच्या नोंदी.
👉२८. सेवा पडताळणीची नोंद.
👉२९. जनगणना रजा नोंद.
👉३०. सुट्टीच्या कालावधीत प्रशिक्षण झालेल्या रजा नोंदी.
👉३१)हिंदी व मराठी भाषा पास झाल्याची वा सुट मिळाल्याची नोंद .

 

 


No comments:

Post a Comment

Popular Posts